एमबीए मध्ये सोनेरी भविष्यसंधी

गुंतवणुकीचा विचार करताना प्रत्येक जण ‘मॅक्झिमाइझ रिटर्न्स अँड मिनिमाइझ रिस्क’ म्हणजे ‘कमाल परतावा आणि कमी जोखीम’ या मंत्राचा उच्चार करत असतो; मात्र
MBA in India Opportunities
MBA in India Opportunities sakal

लवचिकता आणि संधी

‘एमबीए’मधील स्पेशलायझेशनचा विचार करता सर्वांत मोठा फायदा म्हणजे त्यातील लवचिकता, वैविध्य. त्यामुळे तुम्ही कोणत्याही उद्योगामध्ये जाण्याची किंवा पदावर काम करण्याची इच्छा असली, तरी त्या प्रत्येकासाठी विशिष्ट एमबीए आहेच. नुसते माझ्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू, तर स्पेशलायझेन्सकडेही नजर टाका : कन्सल्टिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, जनरल मॅनेजमेंट, ॲनॅलिटिक्स, मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, ह्युमन रिसोर्सेस, इंटरनॅशनल बिझनेस, एंटरप्रीनरशिप आणि इतर किती तरी विभाग.

गुंतवणुकीचा विचार करताना प्रत्येक जण ‘मॅक्झिमाइझ रिटर्न्स अँड मिनिमाइझ रिस्क’ म्हणजे ‘कमाल परतावा आणि कमी जोखीम’ या मंत्राचा उच्चार करत असतो; मात्र आपल्यापैकी काहीच जण शिक्षणाकडेही गुंतवणूक म्हणून बघताना दिसतात. वेळ, प्रयत्न आणि अर्थातच पैसा यांचा समावेश असलेली ही एक प्रकारची गुंतवणूकच असते. त्यामुळेच आपण स्वतःला किंवा मुलांना-विशेषतः सध्याच्या अस्थिरतेच्या काळात- हा महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे, की ‘मी किंवा माझ्या मुलांनी जोखीम कमीत कमी असलेला आणि परतावा जास्तीत जास्त देणाऱ्या कोणत्या अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे?’

आज जगभरात ऑटोमेशन म्हणजे स्वयंचलित यंत्रणांचा वापर वाढत असताना एक कौशल्य इतर कौशल्यांवर मात मात करते आहे ते म्हणजे व्यवस्थापनाचे कौशल्य किंवा खरे तरच व्यवस्थापनाची कलाच. अगदी साध्या म्हणजे लोकांच्या व्यवस्थापनापासून ते टेक्स्ट ॲनॅलिटिक्सवर आधारित प्रचारमोहिमांच्या व्यवस्थापनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यवस्थापन हा अविभाज्य भाग असतो. त्यामुळेच तुमचे करिअर सुरू करण्यासाठी किंवा त्याच्यात अधिक सुधारणा होण्यासाठी मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एमबीए हीच पुढची लॉजिकल पायरी का असू शकते. त्यासाठीच्या काही कारणांची माहिती करून घेऊ.

कॉर्पोरेट जगतात प्रवेश

कॉर्पोरेट करिअर करण्यासाठी आपल्याला कॉर्पोरेट जॉबसाठी अप्लाय करावा लागतो आणि अर्थातच त्यासाठी पात्र व्हावे लागते. जर तुम्ही अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची एंट्री लेव्हलसाठीची पदे बघितली तर ती असतात ‘मॅनेजमेंट ट्रेनी.’ हा काही चुकीचा शब्दप्रयोग अजिबात नाही- या बहुतेक कंपन्यांचे एमबीए असलेल्या उमेदवारांची भरती करण्याचे धोरणच असते. इतर कंपन्यांचा विचार केला, तर त्या जरी एंट्री लेव्हलवरच्या पदांसाठी एमबीए नसलेल्या उमेदवारांची निवड करत असल्या, तरी संबंधित उमेदवाराला नंतर नोकरीत प्रमोशन हवे असल्यास त्याने एमबीए करण्याची आवश्यकता असते. याचाच अर्थ उमेदवार एमबीए नसेल, तर तो विशिष्ट पदांच्या पुढे जाऊ शकत नाही.

एमबीए पदवीधराला मिळणारे वेतन

आपण दिवसातला निम्म्यापेक्षा जास्त वेळ नोकरीत घालवतो त्यासाठीची कारणे म्हणजे दीर्घकालीन सुरक्षा आणि वेतन. एमबीए पदवी मिळवली, की या दोन्ही निकषांवर लाभ मिळतात. तुम्ही इतर पदवी मिळवलेल्या उमेदवाराच्या सरासरी वेतनाची तुलना एमबीए पदवी असलेल्या उमेदवारांशी केली, तर तुमच्या असे लक्षात येईल, की एमबीए पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन एमबीए नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा जास्त असते. एमबीए असलेले कर्मचारी फक्त जास्त वेतन मिळवतात एवढेच नव्हे, तर ते इतर पदवीधारकांच्या सरासरी दुप्पट वेतन मिळवतात. (स्रोत : जीएमएसी १)

भारतात एमबीए पदवीधारक कर्मचाऱ्याचे सरासरी वार्षिक वेतन साडेचार लाख रुपये आहे. एमबीए करण्यासाठीचा सरासरी खर्च तीन लाख रुपये गृहीत धरला, तर तुमच्या एमबीए शिक्षणासाठीची गुंतवणूक तुम्ही दोन ते तीन वर्षांत रिकव्हर करू शकता.

एमबीएसाठीची वाढती मागणी

आंतरराष्ट्रीय विचार करता, अमेरिकेतील ७७ टक्के कंपन्या आणि आशिया-प्रशांत विभागातील ८७ टक्के कंपन्या एमबीए पदवीधारकांची भरती करण्यास इच्छुक आहेत. एका दैनिकाने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, तंत्रज्ञान उद्योगाकडून एमबीए पदवीधारकांना भरती करून घेण्याची मागणी २०२०च्या आधीच्या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत २०२१मध्ये दहा टक्क्यांनी वाढली. फक्त एवढेच नव्हे, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांपैकी ९६ टक्के कंपन्या एमबीए पदवीधारकांना भरती करून घेण्यास २०२१मध्ये इच्छुक असल्याने व्यवस्थापनशास्त्र विभागातील पदवीधारकांसाठीची मागणी तीन वर्षांतील उच्चांकी आहे. त्यामुळे तुम्ही एमबीए केले असेल, तर नोकरी मिळण्याची चिंता करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. एमबीएसाठीची मागणी यपूर्वी भरपूर होती आणि यापुढील काळातही ती जास्त राहील.

बिझनेस नेटवर्किंग

कोणत्याही व्यवसायाच्या यशात नेटवर्किंग हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो आणि एमबीए हा एकमेव अभ्यासक्रम आहे, ज्याच्यात हे कौशल्य अंगभूत रितीने शिकवले जाते. एमबीएचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सहकारी विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर शिक्षकवृंद, डॉक्टरेट विद्यार्थी (या सर्वांना व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव असतो) अशा अनेकांबरोबर संवाद साधायला मिळतो. याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्या संबंधित एमबीए अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्येही प्रवेश करण्याची मुभा मिळते. विविध आऊटरीच प्रोग्रॅम्स किंवा प्लेसमेंट प्रोसेस यांचा भाग म्हणून तुम्हाला विविध उद्योगांमधल्या प्रमुखांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. तुम्हाला कंपन्यांना भेट देण्याचीही संधी मिळते-ज्यामुळे अध्ययनाचा अनुभव द्विगुणित होतो. फुल-टाइम एमबीए प्रोग्रॅम्स हे मैत्रीचे धागे वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आणि या मैत्री आयुष्यभर टिकतात. तुम्ही अनेक स्टार्टअप्सचा प्रवास बघितलात, तर अनेक कंपन्या या विविध बॅचमेट्सनीच सुरू केलेल्या दिसतात. हा एमबीएचा आणखी एक फायदा आहे.

उद्योजकीय कौशल्ये आणि स्रोत

आज अनेक स्टार्टअप कंपन्या बघितल्यात, तर त्या बहुतांश एमबीए केलेल्यांनीच चालवलेल्या दिसतात. यात खरे तर काहीच आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही-कारण बिझनेस स्कूल्स ही उद्योजकीय बीजे तुमच्याच रुजवत असतात. एंटरप्रिनरशिपमधले स्पेशलायझेशन असो किंवा बिझनेस प्लॅन काँपिटिशन्स असोत-एमबीए अभ्यासक्रम आणि एकूणच अभ्यासक्रमासंबंधीचे वातावरण हे तुम्हाला विविध कल्पनांचा शोध घेण्यास आणि त्या प्रत्यक्षात आण्यासाठी उद्युक्त करत असतात.

फक्त एवढेच नाही, तर आज भारतात आयआयएमसह अनेक महाविद्यालयांमध्ये आणि परदेशांमध्ये (हार्वर्डसारख्या विद्यापीठांत हार्वर्ड इनोव्हेशन लॅब समाविष्ट आहे) इन्क्युबेशन सेंटर्सही समाविष्ट असतात. ही इन्क्युबेशन सेंटर्स म्हणजे अशा संस्था असतात ज्या घडत असलेल्या उद्योजकांना त्यांचे व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित अडचणी सोडवण्यामध्ये मदत करतात. विशेषतः सुरुवातीच्या काळात ही इन्क्युबेशन सेंटर्स सीड फंड्स म्हणजे उद्योगबीज निधी, प्रयोगशाळा सुविधा, सल्ला सेवा, नेटवर्क आणि लिंकेजेस अशा विविध व्यवसाय आणि तांत्रिक सेवा उपलब्ध करून देतात.

- मुनिरा लोखंडवाला

(लेखिका शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत. त्या आयआयएम कोलकताच्या माजी विद्यार्थिनी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com