मेहंदी व्यवसायातून करीयर करण्याकडे कल

ज्वेलरी मेहंदी, स्टोरी टेलिंग असे नाविन्यपूर्ण प्रकार प्रसिध्द पावत असल्याने मेहंदी व्यवसायाची रंगत आणि उलाढाल वाढली आहे
Mehendi artists Mehndi tends career in business pune
Mehendi artists Mehndi tends career in business pune sakal
Updated on

कोथरुड : ज्वेलरी मेहंदी, स्टोरी टेलिंग असे नाविन्यपूर्ण प्रकार प्रसिध्द पावत असल्याने मेहंदी व्यवसायाची रंगत आणि उलाढाल वाढली आहे. भारतीय, फ्लोलर, दुबई, अरेबिक, गल्फ या मेहंदीच्या प्रचलित स्टाईल बरोबरच नवे ट्रेंड येत आहेत. मेहंदी आता पूर्वेकडीलच नाही तर पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यामुळेच मेहंदी ही कला आता करीयर म्हणून मान्यता पावताना दिसत आहे. कोथरुडच्या शांतीबन सोसायटीत राहणारी मुशर्रत नईम शेख म्हणते की, या कलेच्या बळावर हीनाबायमुसर्रत नावाने मला ओळख मिळाली आहे. मेहंदी काढण्याच्या स्टाईल मुळे मला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यातून मला अदिती शारंगधर, भार्गवी चिरमुले या अभिनेत्रींसाठी मेहंदी काढण्याचे भाग्य लाभले. आता या व्यवसायातच करीयर करायची इच्छा आहे.

लोंगेस्ट मेहंदी मॅरेथॉन बाय ग्रुप या २०१८ साली झालेल्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुशर्रतची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. मुशर्रत ही वयाच्या सहाव्या वर्षांपासून मेहंदी काढते आहे. मेहंदी आर्टीस्ट असलेल्या आईकडून तीला मेहंदीची ओळख मिळाली. मुशर्रतची आवड लक्षात घेवून तीच्या वडीलांनी तीला मुंबई येथे प्रोफेशनल मेहंदी शिकण्यासाठी पाठवले. चित्रकला, रांगोळी या विषयातही पारंगत असलेल्या मुशर्रतने शाळेमध्ये अगदी पहिली ते दहावी पर्यंत मेहंदी, रांगोळी, चित्रकला या विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला व टीकवला. त्यामुळे तीला उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले होते. या कलेतच करीयर करायचे ठरवलेल्या मुशर्रतने २०१२ पासून मेहंदी व्यवसायाची सुरुवात केली. लग्न समारंभ, ईद दिवाळी, पार्टी, मध्ये ती मेहंदी काढु लागली.

शहरातील मेहंदीच्या क्लासेसना सुध्दा गर्दी वाढली असून बेसिक ते ऍडव्हान्स, बेसिक ते ब्रायडल आदी नावाने कोर्स उपलब्ध आहेत. मेंदीने शरीरावर अलंकार करण्याची प्रथा मोगल लोकांनी मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत वापरल्याच्या शतकांनंतर, बाराव्या शतकात भारतात आणली होती. आपल्याकडेच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये महिलांच्या मेंदीचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. हे व्यवसाय ईद, दिवाळी आणि करवा चौथसाठी रात्रभर उघडे असतात आणि अनेक स्त्रिया मोठ्या विवाहसोहळ्यांसाठी एक संघ म्हणून काम करू शकतात, जेथे वधू-वरांव्यतिरिक्त शेकडो पाहुणे मेंदीने सजवले जातील.

मेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून तसेच उपचारात्मक गुणधर्मांसाठी पुरातन काळापासून केला जात आहे. चहा, कॉफी, लवंगा, चिंच, लिंबू, साखर, आणि विविध तेलांचा वापर डिझाइनचा रंग आणि टीकाऊपणा वाढवण्यासाठी केला जातो. मेंदीत तीन मुख्य परंपरा दिसतात. अरबी (मध्य-पूर्व) मेहंदीमध्ये हात आणि पायांवर मोठे, फुलांचे नमुने असतात, तर भारतीय (आशियाई) मेहंदीमध्ये संपूर्ण हात, पाय आणि बारीक रेषा, लेसी, फुलांचा आणि पेस्ली पॅटर्नचा वापर केला जातो. मुशर्रत शेख - "ब्रायडल मेहंदी" ची फॅशन सध्या वेगाने वाढत आहे, चकाकी, गिल्डिंग आणि फाइन-लाइन वर्कमध्ये नवकल्पनांसह. मेंदी पीसणे, चाळणे, तापमान नियंत्रण आणि पॅकेजिंगमधील अलीकडील तांत्रिक नवकल्पना, रंग सामग्री आणि मेंदीची कलात्मक क्षमता सुधारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com