मन ठेवा प्रसन्न..!

मानसिक आणि शारीरिक स्वस्थ राहणे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
Mental and Physical Health
Mental and Physical Healthsakal
Updated on

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

मानसिक आणि शारीरिक स्वस्थ राहणे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मन प्रसन्न असल्यास बुद्धीला योग्य चालना मिळते. मन स्थिर असल्यास कुठल्याही प्रसंगी विवेकपूर्ण विचार करून निर्णय घेता येतो. अतिशय कठीण निर्णय मग तो व्यवसायात, नोकरीतील किंवा वैयक्तिक असो, मन स्थिर असल्यास ‘न्यूट्रल’ आणि योग्य निर्णय घेता येतो. मनावर ताबा मिळवण्यासाठी खेळ खेळणे, आपल्या करिअरशी निगडित विषयांचा अभ्यास करणे ही नैसर्गिक मार्ग आहेत.

एखादी कला, संगीत (गाणे, नृत्य किंवा एखादे वाद्य वाजवणे) आत्मसात केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते. आपण ‘एक्स्ट्रॉ माइल’ गेलो तर योगा, मनोबल वाढण्यासाठी असलेली पुस्तके, कार्यशाळा आणि आता तर अगदी फेसबुक, इंस्टाग्रामवर असल्यावर ‘हेल्थ’ ग्रुपही मदत करू शकतात.

ध्यानधारणा - हा अविभाज्य भाग आहे. यामुळे भरकटलेले मन एकाग्र होऊन स्थिर होते. यासाठी फक्त सराव नव्हेतर योग्य पद्धतीने ध्यानधारणा शिकली पाहिजे. स्थिर मन योग्य निर्णय घेण्यास तर प्रसन्न मन निर्णय घेऊन पुढच्या दिशा ठरवण्यासाठी मदत करते. मनाच्या प्रसन्नतेसाठी ध्यानधारणेबरोबर छंदही विकसित करणे आवश्यक आहे. सकाळी आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन थोडा वेळ घालविणे, जवळच्या मित्र/मैत्रिणीला भेटणे यामुळेही आपले मन प्रसन्न होते.

स्थिर आणि प्रसन्न मन जसे अडचणीच्या वेळी निर्णय घेण्यास मदत करतात, तसेच शारीरिक सुदृढता कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यात गरजेचे आहे. खेळणे, धावणे, व्यायाम या व्यतिरिक्त आहार, त्याची वेळ पाळणे, चांगल्या मनाने आहार करणे, या सगळ्या शिस्तीच्या आणि सवयीच्या गोष्टी आहेत. शरीराची क्षमता असेल तरच आपण घेतलेले निर्णय पूर्णत्वास नेऊ शकतो.

या सगळ्या गोष्टीचा प्रभाव म्हणजे मानव संसाधन विभाग शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. जेणे करून काम करण्याची क्षमता वाढवता येऊ शकते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्याशी निगडित विषय, अनुभव ही कौशल्य तुम्हाला कुठल्याही पुस्तकात आढळत नाहीत. वय आणि गरजेनुसार ती ओळखून स्वतः विकसित करावी लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com