Meta कंपनीनं अभियांत्रिकी भरतीमध्ये 30 टक्के केली कपात; मार्क झुकरबर्ग यांची माहिती

Mark Zuckerberg
Mark Zuckerbergesakal
Summary

मेटा प्लॅटफॉर्मनं 2022 मध्ये अभियंते घेण्याचं लक्ष्य कमी केलंय.

मेटा प्लॅटफॉर्मनं (Meta Platforms) 2022 मध्ये अभियंते (Engineers) घेण्याचं लक्ष्य कमी केलंय. कंपनीनं सांगितलं की, ते आता 2022 मध्ये केवळ 6 ते 7 हजार अभियंत्यांना कामावर घेणार आहेत. तर, यापूर्वी कंपनीनं 10,000 नवीन अभियंते घेण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गुरुवारी ही माहिती दिलीय.

वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मार्क झुकरबर्ग गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या फेरीत सहभागी झाला होता. दरम्यान, एका कर्मचाऱ्यानं त्याला विचारलं की या वर्षी फेसबुक किंवा मेटामध्ये किती इंजिनीअर्सची नियुक्ती करण्याचा विचार आहे. यावर झुकेरबर्ग म्हणाला, 'या वर्षात 10,000 अभियंत्यांना कामावर घेण्याचं कंपनीचं लक्ष्य होतं. परंतु, आता केवळ 6 ते 7 हजार अभियंत्यांना कामावर घेण्याचा विचार करत आहे. मला वाटतं की तुमच्यापैकी काही जण ठरवतील की, ही जागा तुमच्यासाठी नाहीय. मी इथं बसून वचन देऊ शकत नाही. परंतु, परिस्थिती बदलत असताना आम्हाला पुनर्विचार करावा लागणार नाहीय, असंही झुकरबर्गनं स्पष्ट केलं.

Mark Zuckerberg
एकच मंत्री करणार मोदींचं स्वागत, तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ पोहोचणार सिन्हांच्या स्वागताला!

Meta कंपनीनं अशा वेळी हे पाऊल उचलंय, जेव्हा त्यांचे शेअर्स सुमारे 43 टक्क्यांनी घसरले आहेत. मेटा आता येत्या काही वर्षांत Metaverse वर $10 अब्ज खर्च करण्याची शक्यता आहे. मेटा प्रवक्त्यानं सांगितलं की, आम्ही आमच्या कंपनीतील मुख्य प्राधान्यांचं मूल्यांकन करत आहोत आणि त्याच दृष्टीनं बदल करण्याचा आमचा विचार आहे. विशेषत: ते आमच्या मुख्य व्यवसाय आणि रियल्टी लॅबशी संबंधित आहे. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्क फर्म Meta या वर्षी Facebook द्वारे नोंदवलेल्या वापरकर्त्यांमध्ये तोटा झालाय, त्यामुळं Meta चं बाजार मूल्याच्या जवळपास निम्मं नुकसान झालंय. त्यामुळं कंपनीनं अभियांत्रिकी भरतीमध्ये जवळपास 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com