

Understanding Maslow’s Hierarchy of Needs in the Context of Education
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य (ज्ञानप्रबोधिनी प्रशाला)
शिक्षण चिंतन
अब्राहम मॅस्लो हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानवी प्रेरणा व वर्तन समजून घेण्यासाठी गरजांची श्रेणीबद्ध रचना (Hierarchy of Needs) मांडली. अब्राहम मॅस्लो यांच्या मते मानवी गरजा पाच स्तरांमध्ये विभागल्या जातात आणि या गरजा तळापासून वरच्या क्रमाने पूर्ण होत जातात. या गरजाच माणसाला खालच्या स्तरातून वरच्या स्तरात जाण्याची सतत प्रेरणा देत असतात.