mindfulness : माइंडफुलनेस

Mindfulness: The Art of Living in the Present Moment : माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात जागरूकतेने आणि साक्षीभावाने जगण्याची कला. भूतकाळातील विचार आणि भविष्याची चिंता बाजूला ठेवून मन शांत ठेवण्यास ही पद्धत मदत करते.
Mindfulness: The Art of Living in the Present Moment

Mindfulness: The Art of Living in the Present Moment

esakal

Updated on: 

आयुष्य म्हणजे क्षणाक्षणाची जोडलेली साखळी. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. प्रत्येक क्षण जगायचा असतो. एक गोष्ट आठवते, एकदा एक माणूस मृत्यू पावतो. त्याला भान येतं तेव्हा लक्षात येतं की, समोर देव उभा आहे आणि त्याच्या हातात एक सुटकेस आहे. दोघांमध्ये पुढीलप्रमाणे संवाद होतो.

देव : चल बाळा. निघायची वेळ झाली.

माणूस : छे छे.. अजून माझी खूप कामं बाकी आहेत. खूप योजना अर्धवट राहिल्या आहेत.

देव : नाही. तुझी वेळ आलेय. आता निघावं लागेलच.

माणूस : तुझ्या हातातल्या सुटकेसमध्ये काय आहे?

देव : तुझ्याच गोष्टी आहेत.

माणूस : म्हणजे माझे कपडे.. पैसे वगैरे?

देव : नाही.. त्या गोष्टींवर तर पृथ्वीच्या मालकीच्या होत्या.

माणूस : मग माझ्या आठवणी?

देव : नाही नाही.. त्या तर काळाशी निगडीत होत्या. त्याच्यावर काळाचा अधिकार होता.

माणूस : मग.. माझी बुद्धिमत्ता?

देव : नाही.. त्यावर परिस्थितीचा हक्क आहे. त्या त्या परिस्थितीनुसार तू ती वापरत गेलास.

माणूस : मग माझी बायकामुलं, माझे नातेवाईक, मित्र?

देव : छे.. ते तर जीवन मार्गावरचे सहप्रवासी होते.. त्या मार्गाचा त्यांच्यावर अधिकार होता.

माणूस : मग नक्कीच माझं शरीर असेल?

देव : नाही नाही.. ते तर मातीमोल होतं. पृथ्वीची त्यावर मालकी होती.

माणूस : मग.. नक्कीच माझा आत्मा असेल.

देव (हसून) : नाही बाळा... आत्मा तर माझा आहे. माझाच तर अंश आहे तो.

माणूस (निराशेनं) " म्हणजे माझ्या मालकीचं काहीच नव्हतं?

देव : नाही. तुझ्या मालकीचं काहीच नव्हतं.

माणूस खिन्न होतो आणि देवाच्या हातातील सुटकेस घेऊन उघडतो. ती रिकामी असते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कळवळून विचारतो.

माणूस : म्हणजे माझं काहीच नव्हतं?

देव (हसून) : होतं ना! तू जे क्षण जगलास तो प्रत्येक क्षण तुझा होता.

जगत असलेला प्रत्येक क्षण आपण खरंच ‘जगतो’ का? आपला प्रत्येक क्षण आपला असतो का? तो आपण समरसून वर्तमानात जगतो का?

Loading content, please wait...