नागपूर, मुंबई आणि पुण्यात MKCLची पदभरती; असा करा अर्ज | Jobs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Job

नागपूर, मुंबई आणि पुण्यात MKCLची पदभरती; असा करा अर्ज

नागपूर, मुंबई आणि पुण्यात १०० पदासांठी भरती घेण्यात येत आहे. या भरती संदर्भात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहिरात काढली आहे. ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा त्यांनी या पदासाठी अर्ज करायला हरकत नाहीत.

(Job Requirenment)

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रोजेक्ट ट्रेनी या पदासांठी १०० जागांसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी अर्ज मागवण्यात येत असून यासाठी B.tech/B.E/M.Sc, M.E/M.Tech, MCA या पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडने काढलेल्या जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्र उमेदवारांना २२ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा: केमिकल कारखान्याला भीषण आग; 7 कामगार जखमी, 700 स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

जाहिरातीतील माहितीनुसार परीक्षा घेतल्यानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

दरम्यान यासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या नियमानुसार वेतन दिले जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर, मुंबई आणि पुणे शहरात काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक - https://www.mkcl.org/

Web Title: Mkcl Job Offres Pune Mumbai Nagpur Project Trainee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra NewsjobsMKCL
go to top