
Machine Learning
Sakal
डॉ. राजेश ओहोळ - करिअर मार्गदर्शक
गेल्या दोन दशकांत विविध घटकांमुळे मशिन लर्निंग तंत्रांचा वापर वाढला आहे. मशिन लर्निंगची मुख्य व्याख्या, संगणकांना विशिष्ट प्रोग्रॅम न करता समस्या सोडविण्याची परवानगी देणे होय.
पारंपरिक ऑपरेशन्सपासून ते अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंगसारख्या नवीन प्रगत मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियांपर्यंत आधुनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मशिन लर्निंगचे उपयोजन कसे होईल यावरील संशोधन जगभरात सुरू आहे. कचरा, ऊर्जा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे, मटेरिअल डेव्हलपमेंट आणि उत्पादनात नवोपक्रमांना चालना देणे यावर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे.