Government Jobs : मोदी सरकार दर महिन्याला 16 लाख रोजगार निर्माण करतं; रेल्वेमंत्र्यांचा मोठा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजनांमुळं प्रत्येक वर्गाचं जीवन सुसह्य झालं आहे.

Government Jobs : मोदी सरकार दर महिन्याला 16 लाख रोजगार निर्माण करतं; रेल्वेमंत्र्यांचा मोठा दावा

विरोधी पक्षांचे नेते रोजगारावरुन मोदी सरकारवर (Modi Government) नेहमी निशाणा साधत असतात. सरकार पुरेसे रोजगार निर्माण करू शकत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, आता नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी रोजगार निर्मितीबाबत मोठा दावा केलाय.

केंद्र सरकार दर महिन्याला 16 लाख नोकऱ्या निर्माण करत आहे. अजमेरमध्ये सीआरपीएफनं (CRPF) आयोजित केलेल्या 'रोजगार मेळा' कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, 'जागतिक आर्थिक संकट असतानाही भारत संधींनी भरलेलं पॉवरहाऊस म्हणून उदयास आलं. दर महिन्याला सरासरी 15-16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत.'

हेही वाचा: अंधश्रद्धेचा कळस! भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी 6 वर्षाच्या मुलाचा दिला जात होता बळी, तितक्यात..

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या योजनांमुळं प्रत्येक वर्गाचं जीवन सुसह्य झाल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले. ‘नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट’ हा मंत्र तरुणांना अंगीकारण्याचं आवाहन करून वैष्णव म्हणाले, 'जीवनात तेच लोक जिंकतात ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिलं. जर त्यांनी एकच गोष्ट, एकच मंत्र लक्षात ठेवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही. त्यामुळं प्रत्येकांना राष्ट्र प्रथम नेहमी प्रथम हा मंत्र आत्मसात केला पाहिजे.'

हेही वाचा: दिल्ली पुन्हा हादरली! तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार; सफाई कामगाराला अटक

अश्विनी वैष्णव पुढं म्हणाले, जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अनेक उदाहरणं घेता येतील. परंतु, केवळ तेच लोक पुढं गेले, ज्यांनी आपल्या कर्तव्यात देशाला प्रथम स्थान दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.