

Mukhyamantri Kanya Vivah Yojana
esakal
गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाहाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची 'मुख्यमंत्री कन्या विवाह योजना' राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र वधूला एकूण ५५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये वधूच्या नावावर दिली जाणारी रक्कम, घरगुती साहित्य आणि सामूहिक विवाह सोहळ्याचा आयोजन खर्च यांचा समावेश आहे.