MPSC Prelim Exam Updates: एमपीएससीची २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की ठरल्याप्रमाणेच होणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम!

MPSC Exam and Nagar Panchayat Vote Counting: एमपीएससीची २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळेत होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे
MPSC 21 December Prelims Update

MPSC 21 December Prelims Update

sakal

Updated on

MPSC Exam and Nagar Panchayat Vote Counting On Same Day: नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या २ आणि २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २१ डिसेंबरला होणार आहे.

जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे २१ डिसेंबरला मतमोजणीत व्यग्र राहणार आहेत. परिणामी परीक्षा केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलली जाणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com