
mpsc essay writing
esakal
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे निबंध लेखन. कारण आता नवा पॅटर्न लागू झाला आहे आणि या पॅटर्ननुसार निबंध लेखनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 'पण याची तयारी कशी करायची?' असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी उत्तर आहे 'सकाळ प्लस स्टडीरुम'ने आयोजित केलेले मोफत वेबिनार.
निबंध लेखन हा आता महत्त्वाचा विषय असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण तयारी करत असतानाही योग्य मार्गदर्शन आणि शंका निरसन अत्यंत कळीचे ठरते. एमपीएससी असो वा यूपीएससी, अनेक विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन हा नवा विषय आहे. त्यामुळे 'विषयाची निवड कशी करायची' इथपासून 'निबंधाची सुरुवात कशी करायची', 'चांगली माहिती कुठून निवडायची' आणि 'प्रभावी मांडणी कशी करायची' हे प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत.