MPSC : ‘संयुक्त गट-ब परीक्षा २०२०’ परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षा २०२०’ या परीक्षेची भरतीप्रक्रिया दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे.

MPSC : ‘संयुक्त गट-ब परीक्षा २०२०’ परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

पुणे - ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षा २०२०’ या परीक्षेची भरतीप्रक्रिया दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या एकाच परीक्षेचा अभ्यास किती काळ करावा, याला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तत्काळ मुख्य परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या परीक्षेची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलली पूर्व परीक्षा ४ सप्टेंबर २०२० रोजी झाली. त्यानंतर एमपीएससीने या पूर्व परीक्षेच्या तीन उत्तरपत्रिका जाहीर केल्या, काही प्रश्न रद्द केले. त्यामुळे वाद झाल्याने विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. परिणामी, जानेवारी अखेर होणारी मुख्य परीक्षा तीन महिन्यांपासून रखडली आहे. या प्रकरणी एकाही न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यात आता न्यायालयाला ७ मे पासून सुट्या लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा परीक्षा लांबणीवर पडणार आहे.

एमपीएससी ही एक घटनात्मक संस्था असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तर तालिकेमुळे कोणाचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. जे प्रश्न आयोगाने रद्द केले आहेत, ते प्रश्न आयोगाने एकूण प्रश्नांतून बाद केले आहेत. आयोगाने ५ प्रश्न रद्द केल्यामुळे ती परीक्षा ९५ प्रश्न ९५ गुणांसाठी झाली.

- पवन खांदलकर, अमित देशमुख, विद्यार्थी

एमपीएससीने प्रश्न रद्द केल्याने माझ्यासारख्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे न्यायासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. निकाल आमच्या बाजूने लागला, तर परीक्षा रद्द होऊ शकते. न्याय मागणे हा आमचा हक्क आहे.

- सूरज पवार, याचिकाकर्ते

एमपीएससीचे म्हणणे

परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. अंतिम निर्णय झाल्यावरच तारीख जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने १७ एप्रिल रोजी ट्विटरवर जाहीर केले आहे.

विद्यार्थी म्हणतात

  • परीक्षेचे राजकारण केले जाते

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान

  • अनेक विद्यार्थी नैराश्यात

  • परीक्षा घेण्यासाठी एमपीएससीने तत्काळ कार्यवाही करावी

Web Title: Mpsc Loss Of Students Due To Lack Of Joint Group B Exam 2020 Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top