esakal | एमपीएससीच्या परीक्षेसाठी दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

एमपीएससीच्या परीक्षेसाठी दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२०’ येत्या शनिवारी (ता.४) होणार आहे. उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे, असे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या दिवशी सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र; उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षा कालावधीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई केली जाईल, असे आयोगाने नमूद केले आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

परीक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना :

  • परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही

  • परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक अथवा पालकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.

  • प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक तंतोतंत पालन आवश्यक

  • उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, असा तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

loading image
go to top