वैद्यकीय सेवेतील पदांच्या मुलाखती MPSC ने पुढे ढकलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

वैद्यकीय सेवेतील पदांच्या मुलाखती MPSC ने पुढे ढकलल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) वैद्यकीय सेवेतील काही पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी आयोगाकडून ट्विट करण्यात आले असून विद्यार्थ्यांना प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

पुढे ढकलण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये प्राध्यपक व सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट अ तसेच प्राध्यापक औषधवैदयकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ या पदांच्या मुलाखती दिनांक १९ व २० मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान य़ा चारही पदाच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने सांगितले आहे.

जाहिरात क्रमांक 63/2021, 155/2021, 213/2021, 225/2021 करीता दिनांक 19 व 20 मे 2022 रोजी आयोजित मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Mpsc Postponed Medical Department Posts Interviews Due 19 And 20 May Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mpsc
go to top