
MPSC Result : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर, 'येथे' पाहा यादी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात् आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर संबंधीत निकाल प्रसिध्द करण्यात आला असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ मधील उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक व लिपिक- टंकलेखक या संवर्गासाठी पर्याय दिलेल्या उमेदवारांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचा संवर्गनिहाय निकाल स्वतंत्रपणे दिनांक आज (२६ डिसेंबर, २०२२) रोजी जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Corona Restrictions : कोरोनाचा धोका वाढतोय! आपल्या शेजारच्या राज्यात झाली मास्कसक्ती
या पदांकरिता पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा: Abdul Sattar News : सत्तारांच्या अडचणी वाढणार? राजीनाम्याची मागणी होताच झाले 'नॉट रिचेबल'