

MSBTE Mandates AI in Polytechnics: Google Gemini & Copilot Guidelines
esakal
MSBTE Mandates AI in Polytechnics: तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांशी विद्यार्थ्यांना सुसज्ज ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित तंत्रनिकेतनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) प्रभावी वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मंडळाचे सचिव डॉ. मारुती गायकवाड यांनी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात एआय साधनांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पारंपरिक शिक्षण पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक शिक्षण मिळणे सुलभ होईल, तसेच शिक्षकांचा प्रशासकीय कामांवरील ताण कमी होईल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.