%20(720%20x%201280%20px)%20(1200%20x%20675%20px)%20(27).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mukhyamantri Yuva karya prashikshan Yojana 2024:
युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी युवकांनी अर्ज करावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवार व रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक, आस्थापना यांना जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होण्यास मदत होईल. याचबरोबर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
1) विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाइन पद्धतीने नोंदवतील तसेच बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार देखील https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील.
2) खासगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय आस्थापना, उद्योग तसेच महामंडळामध्ये मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
योजनेच्या लाभासाठी पात्रता-उमेदवारांचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे
उमेदवार बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावा
आधार नोंदणी असावी, बँक खाते आधार संलग्न असावे
रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा
आस्थापना व उद्योजकासाठी पात्रता-आस्थापना व उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा
आस्थापना व उद्योगाने या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी
आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वीची असावी
आस्थापना, उद्योगांनी ईपीएफ, इएसआयसी, वस्तु व सेवा कर, निगमन प्रमाणपत्र, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी सहा महिने असेल
या कालावधीसाठी उमेदवारांना विद्यावेतन सरकारमार्फत थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल
उमेदवारांना देण्यात येणारे विद्यावेतन हे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे असेल
बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह सहा हजार रुपये, आयटीआय, पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह आठ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना प्रतिमाह १० हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.