पुणे - मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूर्वनियोजित आहेत. अशातच राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा याच कालावधीत होत आहेत. असे असतानाही शिक्षक भरतीसाठी होणारी ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ ही परीक्षादेखील २४ मे ते पाच जून या कालावधीत होत आहे.