

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा (Mumbai university) दिक्षांत सोहळा (dikshant sohala) येत्या १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मोठ्या थाटामाटात होणार आहे. मागील वर्षी सुरू असलेल्या कोरोना (corona) आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑनलाईन पद्धतीने (online) दीक्षांत सोहळा पार पडला होता. मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भात (corona infection) कमी झाल्याने हा सोहळा ऑफलाईन पद्धतीने (offline) आणि मोठ्या गाजावाजात होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून (university website) करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
जे विद्यार्थी २०२१ मधील प्रथम तसेच व्दितीय सत्रामध्ये त्यांच्या परीक्षेत दीक्षान्त समारंभाच्या दिवसापूर्वी म्हणजे १० डिसेंबर २०२१ पूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभानंतर पदवी, पदविका प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयातुन वितरीत करण्यात येतील. यावर्षीच्या पदवी, पदविका प्रमाणपत्राची यादी लवकरच मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातील आपले पदवी प्रमाणपत्र क्रमांक विद्यार्थ्यांनी शोधून आपल्या महाविद्यालयात सादर करावे म्हणजे महाविद्यालय आपणास आपले पदवी, पदविका प्रमाणपत्र वितरीत करेल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
पदवी, पदविका प्रमाणपत्रे न मिळाल्यास किंवा त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यासंबंधीची लेखी तक्रार दीक्षान्त समारंभाच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत विद्यानगरी येथील परीक्षा विभागात करावी असे प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी सांगितले. २०२० चा मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समांरभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला होता. या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदवी,पदविका प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.