esakal | Nagpur : परीक्षा लांबल्या उमेदवारांच्या वयोमर्यादेचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

Nagpur : परीक्षा लांबल्या उमेदवारांच्या वयोमर्यादेचे काय?

sakal_logo
By
मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे एमपीएससी आणि सरळसेवेच्या जाहिराती निघालेल्या नाहीत. त्यामुळे नोकरभरती बंद आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराने अनेक विद्यार्थी परीक्षेमधून बाद होत असल्याने राज्यभरातील लाखो उमेदवारांचे भविष्य अधांतरी ठरू लागले आहे. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी काय करावे ? असा सवाल आता उठू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन वाढीव संधीची सवलतीचा शासन निर्णय काढण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र, या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी सातत्याने अभ्यास करीत आहेत. विशेष म्हणजे, या दोन वर्षाच्या कालावधीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थवटच राहिले आहे. या कालावधीत एमपीएससीकडून कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती.

आता सोमवार ४ ऑक्टोबरला आयोगाकडून राज्यसेवासाठी २९० पद भरतीकरिता जाहिरात काढण्यात आली. ही परीक्षा येत्या २ जानेवारी २०२२ ला होणार आहे. मात्र वयोमर्यादिमुळे लाखो विद्यार्थी ही परीक्षाच देऊ शकणार नाहीत. ज्या विद्यार्थ्याचा जन्म १ जानेवारी १९८४ ला झाला, त्या विद्यार्थ्याला १ जानेवारी २०२२ ला ३८ वर्ष पूर्ण होतील. एमपीएससीने दिलेली तारीख आहे ती १ एप्रिल २०२२ आहे.

तेव्हा हा विद्यार्थी आपसुकच या वयोमर्यादाच्या अटीतून बाहेर पडतो. जेव्हा की २०२०-२१ साठी अशी कुठलीही जाहिरत आयोगाकडून कोरोना प्रादुर्भावामुळे आली नाही. यापूर्वी २०१९ ला जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा एकप्रकारे नैसर्गिक न्यायाचे हक्काचे एकप्रकारे हनन होत असल्याची ओरड विद्यार्थी करीत आहे.

वय वाढविण्याची केली होती घोषणा

शासनाने एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना वय वाढीच्या सवलतीचा फायदा देऊ अशी सकारात्मक घोषणा करण्यात आली होती. अद्यापही या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उमेदवारांचे हित लक्षात घेऊन दोन वाढीव संथीच्या सवलतीचा शासन निर्णय काढावा, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

loading image
go to top