esakal | हरियाणातील 'आरोग्य'त नर्स, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

बोलून बातमी शोधा

National Health Mission
हरियाणातील 'आरोग्य'त नर्स, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : NHM Haryana Recruitment 2021 Notification : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था ( National Health Mission, District Health & Family Welfare Society (DHFWS) यमुनानगर, हरियाणा यांनी विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जनरल फिजीशियन, रेडिओलॉजिस्ट, डेटा अ‍ॅनालिस्ट आणि स्टाफ नर्स या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून एकूण 8 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे या पदांसाठी पात्र उमेदवारांनी संस्थेच्या (nhmharyana.gov.in) संकेस्थळावर जावून आपला अर्ज सादर करावा. या पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी, एमओ के 2, जनरल फिजिशियन 1, रेडिओलॉजिस्ट 1, डेटा अ‍ॅनालिस्ट 1, स्टाफ नर्स या 2 पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

केंद्रीय विद्यालयाकडून प्रवेशासंदर्भात मोठा निर्णय; आता 'असे' होणार Admission

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस पदवी घेतली पाहिजे.

  • जनरल फिजिशियन पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस पदवी घ्यायला हवी.

  • डेटा विश्लेषकांच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत 50% ते 12 वी पास असावेत. याशिवाय ओ लेव्हल कोर्सचे ज्ञान असले पाहिजे.