
वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने पुढील वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये एमडीएस डीएनबी, आणि एसएस सारख्या महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे नीट पीजी च्या तारखांचा यात समावेश नाही, या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.. NBEMS ची अधिकृत वेबसाइट nbe.edu.inवर जाऊन परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता. माहितीनुसार हे प्राथमिक वेळापत्रक आहे.