एनडीए प्रवेशाची अधिसूचना पुढील वर्षी निघणार

केंद्र सरकारची ‘एनडीए’बाबत माहिती
National Defence Academy
National Defence AcademyNational Defence Academy
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) दारे महिलांसाठी खुली करणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने यासाठीच्या प्रवेश परीक्षेची अधिसूचना पुढील वर्षी मे महिन्यात जारी करण्यात येईल अशी माहिती आज सर्वोच्च न्यायालयात दिली.

या प्रवेशासाठीच्या कालमर्यादेचा विचार करता त्यासाठी योग्य नियोजन आणि तयारी करणे गरजेचे असून त्यामाध्यमातून महिला उमेदवारांच्या प्रवेशाची प्रक्रिया अधिक सुलभपणे पार पडू शकेल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याबाबतचे शपथपत्र आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. एनडीएची प्रवेश परीक्षा ही वर्षातून दोनदा घेतली जाते, या परीक्षेच्या आयोजनासाठी योग्य यंत्रणेची उभारणी करण्यासाठी मे २०२२ पर्यंतची डेडलाईन निश्‍चित करण्यात आली. यूपीएससीला देखील अधिसूचना जारी करण्यासाठी तितका वेळ मिळणे गरजेचे असते. एनडीएमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिला उमेदवारांसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

“Gender Gap in Management Education Narrows as Schools Push for Inclusion”
“How International Collaborations Are Shaping Future Business Leaders”
“How MBA Programs Are Equipping Students to Thrive in a VUCA World”
CBSE Launches Parenting Calendar for Holistic Child Development
Marathi News Esakal
www.esakal.com