esakal | NEET Exam: नांदेडमध्ये रविवारी ३५ केंद्रावर होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam 2021

परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील

NEET Exam: नांदेडमध्ये रविवारी ३५ केंद्रावर होणार परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: ‘नीट’ परीक्षा येत्या रविवारी (ता. १२ सप्टेंबर) दुपारी दोन ते पाच या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण ३५ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

या परीक्षा केंद्राच्या परिसरात ता. १२ सप्टेंबर रोजी दोन वाजल्यापासून ते सांयकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

loading image
go to top