esakal | मेडिकल प्रवेशासाठी आज ‘नीट’ परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam 2021

मेडिकल प्रवेशासाठी आज ‘नीट’ परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुण्यातून वीस हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा रविवारी (ता. १२) घेण्यात येत आहे. देशभरातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. देशातील २०२ शहरांमध्ये रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ही परीक्षा होणार आहे. पुण्यातून जवळपास वीस हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा कागद, स्टेशनरी, पाणी, मोबाईल फोन, इअर फोन, कॅलक्युलेटर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, गॅझेट घेऊन जाऊ नये, असे एनटीएतर्फे सांगण्यात आले आहे. यंदा इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उर्दू, पंजाबी यांसह १३ भाषांमध्ये या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरतानाच प्रश्नपत्रिकेच्या भाषेचे माध्यम निवडले आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहेत.

loading image
go to top