esakal | नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक |NEET PG 2021 Results
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam 2021

NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

sakal_logo
By
नामदेव कुंभार

NEET PG 2021 Results: राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) NEET PG 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. लवकरच nbe.edu.in या अधिकृत संकेतस्थलावर निकाल पाहण्याची लिंक कार्यरत होणार आहे. नीट पीजी परीक्षेचा निकाल मेरिट लिस्टच्या स्वरुपात जारी करण्यात आला आहे. यामध्ये बैठक क्रमांक गुण(800 पैकी) आणि उमेदवारांना मिळालेला रँक यासारख्याचा उल्लेख असेल. 11 सप्टेंबर 2021 रोजी देशभरात 260 हून आधिक शहारात 800 केंद्रावर NEET PG 2021 परीक्षा घेण्यात आली होती. निकालासोबतच पात्र विद्यार्थ्यांची कट-ऑफही जारी करण्यात आली आहे. (National Eligibility cum Entrance Test, Postgraduate )

असा पाहा NEET PG 2021 चा निकाल

स्टेप 1: अधिकृत संकेतस्थळ nbe.edu.in वर जा

स्टेप 2: संकेतस्थळावरील रिजल्टच्या (NEET PG 2021) लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: सर्व माहिती भरा अन् सबमिट करा.

स्टेप 4: निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.

स्टेप 5: निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

NEET वैद्यकीय आणि डेंटल अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुमारे 55,000 जागा उपलब्ध आहेत. 11 सप्टेंबर 2021 रोजी देशभरात नीट पीजी परीक्षा पार पडली होती. यंदा सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व वैद्यकीय आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी हजेरी लावली होती. लवकरच याची Answer Key उपलब्ध होणार आहे.

NEET Answer Key 2021 : डाउनलोड कसे करावे?

सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत वेबसाइटला neet.nta.nic.in भेट द्यावी.

तद्नंतर मुख्यपृष्ठावर प्रदर्शित Answer Key लिंकवर क्लिक करावे.

तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा आणि सबमिट करा.

आता 'उत्तर की' डाउनलोड करा आणि ती आपल्याकडे जपून ठेवा.

'उत्तर की'विरोधात कोणताही आक्षेप मांडण्याची परवानगी दिली जाणार

loading image
go to top