esakal | तामिळनाडूत NEET रद्द; बारावीच्या गुणांवर होणार MBBS प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Exam

तामिळनाडूत NEET रद्द; बारावीच्या गुणांवर होणार MBBS प्रवेश

sakal_logo
By
सुधीर काकडे

एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली NEET परिक्षा नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. त्यातच आता तामिळनाडू सरकारने NEET परिक्षेबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूच्या विधानसभेत आज NEET परिक्षा रद्द करणारे विधेयक मांडण्यात आले. AIADMK च्या सर्व आमदारांनी या विधेयकाला पाठींबा दिला. तर भाजपने या विधेयकाचा विरोध करत थेट सभागृह सोडले. NEET परिक्षा रद्द करुन त्या ऐवजी थेट १२वीच्या गुणांवर MBBS आणि BDS या शाखांना प्रवेश मिळणार आहे.

विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून हे विधेयक मांडले गेले असता भारतीय जनता पक्षाने या विधेयकाला विरोध केला. भाजप सोडून सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. भाजपने या विधेयकाचा विरोध करत, सभात्याग केला. डीएमकेच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याने हे विधेयक पास झाले. दरम्यान, डीएमकेने याबद्दल आपली भूमिका मांडताना सत्ता मिळताच आम्ही NEET परिक्षा रद्द प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बाराबीच्या गुणांवरच MBBS आणि BDS शाखांना प्रवेश मिळण्यासाठी देखील राज्य सरकार पावलं उचलत असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले.

loading image
go to top