
NEET UG 2025 Exam Timetable: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी NEET UG 2025 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नीट युजी 2025 परीक्षा 4 मे रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत पेन आणि पेपर पद्धतीने होणार आहे. NEET UG 2025 साठी अर्ज आणि नोंदणी neet.nta.nic.in वर देखील सुरू झाली आहे. संपूर्ण NEET परीक्षा कधीपासून सुरू होणार आणि या परिक्षेसाठी फि किती हे जाणून घेऊया.