NEET UG चं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार; जुलैमध्ये परीक्षा?

NEET UG 2022
NEET UG 2022esakal
Summary

NEET UG परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

NEET UG 2022 : देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी (National Eligibility cum Entrance Test) घेण्यात येणाऱ्या NEET UG परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी UG परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचंही समजतंय. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. NTA लवकरच परीक्षेची अधिकृत माहिती जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला nta.ac.in भेट देत राहण्याचा सल्ला दिला गेलाय.

नीट यूजीसाठी (NEET UG Application Process 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर MBBS आणि BDS अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार NEET, neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीट यूजी परीक्षेद्वारे एमबीबीएससाठी 2022 मध्ये 90,825, बीडीएस 27,948, आयुष 52,720, बीव्हीएससी आणि एएच 603 जागांसाठी प्रवेश घेतला जातो. यामध्ये 1,899 एम्स आणि 249 JIPMER जागांचा समावेश आहे.

NEET UG 2022
MHT-CET अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

वयोमर्यादेत बदल

नॅशनल मेडिकल कमिशननं (NMC) NEET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची उच्च वयोमर्यादा रद्द केलीय. यापूर्वी अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे ठेवण्यात आली होती, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 30 वर्षे होती.

NEET UG 2022
'जेईई' मेन परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

'या' कागदपत्रांची आवश्यकता

-पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत आणि उमेदवारांचा पोस्टकार्ड आकाराचा फोटो

-इयत्ता 10 वी आणि 12 वीची मार्कशीट

-उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)

-विद्यार्थ्यांच्या डाव्या अंगठ्याच्या ठशाची स्कॅन केलेली प्रत

-वैध सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळ

खपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com