
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (नेट) २०२२ ची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
NET : 'नेट’साठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात
बेळगाव - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) (UGC) राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (नेट) (NET) २०२२ ची अर्ज प्रक्रिया (Form Process) सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) द्वारे ही परीक्षा (Exam) घेतली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली आहे.
डिसेंबर २०२१ व जून २०२२ मध्ये होणाऱ्या दोन्हा परीक्षा एकत्रित होत असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३० एप्रिलपासून संकेतस्थळ खुले करण्यात आले आहे. २० मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधीची अधिसूचना एनटीएने जाहीर केली असून अर्जामध्ये चूक असल्यास २१ मे ते २३ मे या दरम्यान दुरुस्ती करता येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. कोणतीही समस्या असल्यास विद्यार्थी एनटीएच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात. ही परीक्षा यंदाही ऑनलाईन पद्धतीने होणार असून एकूण ८२ विषयांतील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र असतील. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधीत विषयात देशातील कोणत्याही महाविद्यालयात शिकविण्याची संधी मिळणार आहे.
कोणत्या शहरात व केंद्रावर परीक्षा होत आहे, याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तसेच आपल्या हॉलतिकीटवर देण्यात येणार आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरुन परीक्षार्थीला हॉलतिकीट डाउनलोड करावे लागेल. दरम्यान, सामान्य वर्गासाठी १,१०० रुपये, सामान्य-ईडब्ल्यूएस-ओबीसी-एनसीएलसाठी ५५० रुपये, तर एससी, एसटी, पीडब्लूडी व तृतीयपंथियांसाठी २७५ रुपये शुल्क असेल. संकेतस्थळाच्या होमपेजवर युजीसी नेट डिसेंबर २०२१ व जून २०२२ असे लिहिलेले असेल. यानंतर आपली सर्व माहिती भरावी. त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून रक्कम भरल्यानंतर नेट-युजीसीसाठी अर्ज जमा होईल. त्याची आपल्याकडे एक प्रिंट ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Web Title: Net Application Process For Net Begins
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..