Government Scheme Girls Education: नव्या युगातील मुलींच्या क्षमतेला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार एक अभिनव योजना सुरू करत आहे. २४ जून मंगळवारी उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमधून या योजनेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) यांनी एकत्रितपणे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत हा पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे.