
New Education Guidelines For Student Safety: राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. पोक्सोच्या प्रभावी अंमलबजावणीसह शाळांत तक्रार पेटी बसविणे, सखी सावित्रीचे गठण, सीसीटीव्ही बसविणे व विद्यार्थी वाहतुकीवेळी काळजी घेणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे.