
NHPC apprenticeship recruitment 2025: जर तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर नोकरी सुरू करायची असेल, पण मार्ग सापडत नसेल... ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) ने 350 + पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू केली आहे. अप्रेंटिसशिपमध्ये निवड झाल्यानंतर, तुम्हाला दरमहा नोकरी प्रशिक्षणासह चांगले स्टायपेंड मिळेल. NHPC ने 11 जुलैपासून अप्रेंटिससाठी अर्ज सुरू केले आहेत. ज्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 असणार आहे. या काळात तुम्ही www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा किती आहे? तुम्हाला किती पैसे मिळतील? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.