असे म्हणतात की, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची जीवनशैली एवढी बदलली आहे की, निरोगी मन आणि निरोगी शरीर हे दोन्हीही अनेकांसाठी स्वप्नवत ठरू लागले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी ‘निरामय आरोग्यवर्धिनी’ हे राहुल करुरकर लिखित आणि निरामय पथ लिमिटेड प्रकाशित पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकते.