
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) संशोधन अधिसूचना जारी करत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गैरवैद्यकीय शिक्षकांच्या भरतीची मर्यादा १५ वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने (एमएसएमटीए) तीव्र विरोध दर्शविला असून एनएमसीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.