NTAEsakal
एज्युकेशन जॉब्स
National Testing Agency: 2025 पासून NTA फक्त प्रवेश परीक्षा घेईल! भर्ती परीक्षांमध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती
NTA: केंद्र सरकारकडून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीत अनेक बदल केले जातील. 2025 पासून NTA फक्त प्रवेश परीक्षाच आयोजित करेल. भर्ती परीक्षा NTA कडून घेतली जाणार नाही
नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आता फक्त प्रवेश परीक्षा घेईल. 2025 पासून एनटीए भर्ती परीक्षा घेणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 17 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले की, एनटीए फक्त उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करेल. त्यांनी हेही सांगितले की सरकार लवकरच संगणक आधारित आणि तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा घेण्याचा विचार करत आहे.