NTSE स्टेज-2 परीक्षा स्थगित; 'National Council'ने घेतला मोठा निर्णय

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनलने राष्ट्रीय टॅलेंट सर्च स्टेज-2 परीक्षा पुढे ढकलली आहे.
NTSE
NTSEesakal

NTSE stage 2 Exam 2020-21 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) राष्ट्रीय टॅलेंट सर्च स्टेज 2 परीक्षा (NTSE 2020-21) पुढे ढकलली आहे. एनसीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भात नोटीस बजावली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, देशभरातील कोविड संक्रमणामुळे राज्य, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाउन असल्याने स्टेज -2 परीक्षा पुढे ढकलली आहे. दरम्यान, कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर नवीन तारीख दिली जाईस, असेही नमूद केले आहे. (NTSE Stage 2 Exam Postponed)

राष्ट्रीय टॅलेंट सर्च स्टेज-2 परीक्षा, 2021 13 जून 2021 रोजी होणार होती. यापूर्वी स्टेज -1 परीक्षा 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. मेघालय, नागालँड, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 12 डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. त्याचबरोबर स्टेज -1 परीक्षा इतर राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती.

एनसीईआरटीतर्फे घेण्यात आलेल्या स्टेज -2 परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीमार्फत दरमहा दोन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, तर अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 1,250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना दरमहा 2,000 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याचबरोबर, इतर श्रेणीतील विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मानकांनुसार शिष्यवृत्ती दिली जाईल. या शिष्यवृत्तीचे आरक्षण केंद्र सरकारच्या आरक्षण धोरणानुसार निश्चित केले जाते.

दरम्यान, विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढविण्यासाठी एनटीएसई परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. एनटीएसई स्टेज 1 परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा असते, जी परीक्षा राज्याचे परीक्षा नियामक किंवा संबंधित राज्यातील अधिकारी विभाग घेतो. त्याचबरोबर एनसीईआरटीकडून स्टेज 2 परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना अकरावी ते पीएचडी पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते.

NTSE Stage 2 Exam Postponed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com