- प्रमोद कांबळे, चित्रकार, शिल्पकार
ओबड-धोबड दगडातून आपल्याला हवी तशी मूर्ती साकारणं किंवा मातीमधून एखादा छानसा पुतळा तयार करणं ही केवळ कला नाही, तर अनेक वर्षांची प्रदीर्घ साधना असते. संयमाने केलेला सराव असतो. शिल्पकलेच्या अनवट वाटेवरून चालणारे प्रवासी आज संख्यात्मक दृष्ट्या कमी आहेत. मात्र, त्यामुळेच त्यांच्या कामाला चांगला वाव आहे.