esakal | विशेष : सिव्हिल इंजिनिअरिंग अष्टपैलू अभियांत्रिकी शाखा I Engineering
sakal

बोलून बातमी शोधा

Civil Engineer

विशेष : सिव्हिल इंजिनिअरिंग अष्टपैलू अभियांत्रिकी शाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालवाडीतील मुलांना ‘मॅन मेड’ व ‘गॉड मेड’ वस्तू ओळखायला शिकवतात. त्यातील ९० टक्के मॅन मेड गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंग तंत्रज्ञानाने बनतात. घरे, इमारती, बोगदे, रस्ते, पूल, बंदरे, धरणे... ही यादी खूप मोठी आहे. मराठीत या शाखेला ‘स्थापत्य’ म्हणजे बांधकाम असे नाव असले, तरी ती केवळ बांधकामापुरती मर्यादित नाही. तिला विविध आयाम आहेत. त्यामुळेच ही एक अष्टपैलू अभियांत्रिकी शाखा आहे.

विविध शाखा

१. बांधकाम

२. पर्यावरण

३. वाहतूक

४. सागरी

५. संरचनात्मक

६. नागरी नियोजन

७. जल संसाधन

८. भू-तांत्रिक

९. स्थापत्य व्यवस्थापन

१०. स्ट्रक्चरल ऑडिटिंग

करिअरमधील संधी...

धोपट मार्ग

१) बांधकाम व्यावसायिकाकडे अथवा सल्लागाराकडे सुरुवातीची काही वर्षे अनुभव घ्यायचा. ही वर्षे उच्चशिक्षण घेतले असे समजायचे. स्वतःचे पैसे खर्च कारण्यापेक्षा कमावत शिक्षण घेणे केव्हाही चांगले. नंतर स्वत:चा व्यवसाय सूरू करायचा. शून्यातून विश्व निर्माण करणारे बिल्डर्स, सल्लागार खूप आहेत. पुण्या-मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा नाशिक आदी भागातील विकसनशील शहरात खूप संधी आहेत आणि अनुभव घेण्यासाठी पुणे, मुंबई आहेच. सुरुवातीला प्राप्ती जरा बेताची असते, पण नंतर वाढतच जाते. इतर कोणत्याही नोकरीपेक्षा ही वाढ लक्षणीय आहे.

२) सरकारी नोकरी

जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या देणारी अभियांत्रिकी शाखा ‘सिव्हिल’च आहे. पीडब्लूडी, सिंचन, इरिगेशन, रेल्वे, बंदरे, जलवाहतूक, नागरी नियोजन, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात, नगरपालिका, राज्य, व केंद्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मुलींसाठी सरकारी क्षेत्रात २० टक्के आरक्षण आहे.

३) संशोधन, अध्यापन हे सर्व क्षेत्रात असणारे मार्ग इथेही उपलब्ध आहेतच|

वेगळ्या वाटा...

बँकेत नोकरी

अ) स्ट्रक्चरल ऑडिटर

बँका राहत्या सदनिकेवर मोठ्या प्रमाणावर कर्जे देतात. या मुदतीत इमारती पडणार नाहीत, याची खात्री करावी लागते. या मजबुतीची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी सिव्हिल इंजिनिअर्स लागतात. एफएसआय वाढल्यावर वरचे मजले बांधण्यासाठी व पुनर्विकासाला विरोध करण्यासाठीही असे मजबुतीचे प्रमाणपत्र लागते.

ब) लेंडिंग इंजिनिअर

नवीन बांधकामातील सदनिकेवरही कर्जे दिले जाते ते योग्य खर्च होतो आहे, तसेच बांधकाम दर्जेदार व नियमानुसार होते आहे, हे तपासण्याची जबाबदारी सिव्हिल इंजिनिअरकडेच असते. बँका या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र व्यावसायिकाचा सल्ला घेतात किंवा पगारी इंजिनिअरची नेमणूक करतात.

कोर्टातील नोकरी

कोर्टात नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचे कोर्ट कमिशनर असे भारदस्त पद आहे. दोन भावांमधील मालमत्तेचे मूल्यांकन व वाटणी, तसेच कोर्टात येणाऱ्या इतर खटल्यातील जमिनी, इमारती यांचे मूल्यांकन अशा अनेक लवदांची कामे ही कोर्टातील इंजिनिअर्सची जबाबदारी असते.

आंतरदेशीय फर्ममधील नोकरी

CBRE, JLL, Knight Frank यांसारख्या अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सिव्हिल इंजिनिअर्सची आवश्यकता असते. बुलेट ट्रेनसाराख्या अनेक मोठ्या प्रकल्पांतील परदेशी गुंतवणूक अशा कंपन्यामार्फत होते. हे प्रकल्प नीट होत आहेत की नाहीत, पैसे बुडणार तर नाहीत ना, यावर या कंपन्या देखरेख करतात. योग्य तंत्रज्ञान वापरले जात आहे ना, त्याची किंमत बरोबर आहे ना, या सारख्या बऱ्याच गोष्टी असतात. टक्नो इकोनॉमिक व्हाएबिलिटी असे म्हणतात. अशा मल्टिनॅशनल कंपन्यांमधून चांगल्या पगाराची नोकरी मिळवता येते.

स्थानिक फर्म

प्रेजेक्ट मॅनेजमेंट, ऑडिटिंग, प्रकल्प तपासणी करणाऱ्या फर्मही सिव्हिल इंजिनिअर नोकरीवर ठेवतात. प्रकल्पाचे सर्व दृष्टीने मूल्यांकन गरजेचे असत. काही स्थानिक फर्म एक्स्टिमेशन व कॉस्टिंगही करतात.

मटेरिअल टेस्टिंग

स्टील, काँक्रिट, पाणी, विटा, फर इत्यादी बांधकाम साहित्याचा दर्जा तपासणे गरजेचे असते. तसे प्रमाणपत्र सरकारी कंत्राटे मिळवण्यासाठी लागते. अशी प्रमाणपत्रे महाविद्यालये देतातच, पण काही खासगी प्रयोगशाळाही आहेत. पर्यावरण तपासणी ही प्रयोगशाळाही स्थापत्य इंजिनिअर चालवू शकतो.

समुद्रातील बांधकाम

जमिनीखालील पेट्रोल काढून संपत आल्यावर मनुष्य आता समुद्राच्या तळामधून पेट्रोल काढत आहे, तेव्हा त्या तेलखाणी समुद्राच्या तळाशी बांधाव्या लागतात. हे सिव्हिल व यंत्रशास्त्राला आव्हान असून, ते सिव्हिल इंजिनिअर सहजपणे पेलत आहेत.

माणसाचा इतिहास विकासाचा आहे व सिव्हिल इंजिनिअरिंग हा विकासाचा श्वास आहे. नदीजोड प्रकल्प, नदीतील वाहतूक, सियाचिन व हिमालयातील रस्ते, समुद्रावरचे पूल, विमानतळे या गोष्टी सरकार प्राधान्याने करत आहे. आपला भारत देश झपाट्याने विकासाकडे झेप घेत आहे. त्यामुळे भविष्यात भरपूर सिव्हिल इंजिनिअर लागत आहेत, यात शंका नाही.

- प्रा. नूतन पाठक

loading image
go to top