बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

बारावीनंतरच्या औषधनिमार्णशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Online Form
Online FormSakal
Summary

बारावीनंतरच्या औषधनिमार्णशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

पुणे - बारावीनंतरच्या औषधनिमार्णशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या गुणवत्ता याद्या ११ जुलैला, तर अंतिम गुणवत्ता याद्या १५ जुलैला जाहीर होतील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता पोस्ट एचएससी पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्क्रुटनी पर्याय निवडू शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज सुविधा केंद्राद्वारे पडताळले जातील आणि निश्चित केले जातील. तसेच विद्यार्थी प्रत्यक्ष स्क्रुटनीचा पर्याय देखील स्वीकारू शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज पडताळणी व त्याची निश्चितीची प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

कॅप जागांअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कॅप गुणवत्तेसाठी आणि कॅपद्वारे प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी/पालकांसाठी सूचना -

- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशिलासह व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आवश्यक शुल्कासह संपूर्ण अर्ज भरावा.

- सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाकडून बारावीच्या परीक्षेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्रता तपशील भरावेत आणि अर्ज पूर्ण करावा.

- राज्याबाहेरील विद्यार्थी हे केवळ संस्थास्तरावरील जागांसाठी पात्र असतील.

प्रवेशाची माहिती पुस्तिका आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://phd22.dte.maharashtra.gov.in/

प्रवेशाचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे : ९ जून ते ८ जुलै

- कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : ९ जून ते ८ जुलै

- विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ११ जुलै

- गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे : १२ ते १४ जुलै

- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : १५ जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com