Pune University : विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी प्रदान सोहळा मे-जून २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
savitiribai phule pune university
savitiribai phule pune universitysakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी प्रदान सोहळा मे-जून २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे करण्यात आले आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ‘convocation.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी ३० मार्चपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाचा नमुना, शुल्क याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com