YCMOU Exam : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ‘मुक्त’ची हिवाळी परीक्षा होणार ऑफलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ‘मुक्त’ची हिवाळी परीक्षा होणार ऑफलाइन

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) हिवाळी सत्र परीक्षा ऑफलाइन (Offline Exam) पद्धतीने होणार आहे. जानेवारीच्‍या अंतीम आठवड्यात प्रमाणपत्र ते पदव्‍युत्तर पदवी अशा एकूण ५१ शिक्षणक्रमांची परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने आखले आहे. राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून, अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

कोरोना (Coronavirus) महामारीमुळे अनेक विद्यापीठांकडून ऑनलाइन (Online Exam) स्‍वरुपात परीक्षा घेण्यात आली होती. मुक्‍त विद्यापीठानेही गत शैक्षणिक वर्षाच्‍या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. परंतु, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ अंतर्गत हिवाळी सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्‍या एकूण ५१ शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा जानेवारीच्‍या अंतीम आठवड्यापासून घेण्याचे निश्‍चित झाले आहे. त्‍यामूळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रत्‍यक्ष हजर राहून लेखी पेपर द्यावा लागणार आहे.

हेही वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; जाणून घ्या किंमत-फीचर्स

असे असेल परीक्षेचे स्‍वरुप

विद्यापीठातर्फे ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्‍नपत्रिकेत आशयात्‍मक स्‍वरुपाचे प्रत्‍येकी पाच गुणांसाठी एकूण वीस प्रश्‍न विचारले जातील. त्‍यापैकी १६ प्रश्‍न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेत मिळालेले गुण गुणपत्रकांत विद्यापीठ मूल्‍यमापन या अंतीम परीक्षेच्‍या शीर्षाखाली ८० गुणांमध्ये दर्शविले जातील. राज्‍य शासनाच्‍या आदेशानुसार कोविड-१९ च्‍या नियमांचे पालन करुन, विद्यापीठाने निश्‍चित केलेल्‍या केंद्रांवर या परीक्षा होतील.

प्रवेशपत्र लॉगइन आयडीवर

विद्यापीठ यापूर्वी घेत असलेल्‍या लेखी परीक्षेप्रमाणे ही परीक्षा होणार आहे. परीक्षेपूर्वी सर्व सूचनापत्रके व वेळापत्रके विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर जाहीर केले जातील. तसेच, परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) हे देखील विद्यार्थी लॉगीनमध्ये उपलब्‍ध करुन दिले जाणार आहे. छापील प्रवेशपत्र विद्यार्थी किंवा अभ्यासकेंद्राला पाठविले जाणार नसल्‍याचे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: चर्चमध्येच ख्रिस्ती धर्मगुरुंचा स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न

Web Title: Open University Winter Exams Will Be Held Offline By The End Of January See Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationYCMOU
go to top