उच्च शिक्षणातील संधी

विलास सावरगावकर, अमेरिका
Thursday, 20 February 2020

जगातील बहुतेक फार्मा कंपनीचे मुख्य कार्यालये न्यू जर्सी येथे आहेत, यामुळे आपणास इंटरशिप व पुढे कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

परदेशात शिका  : 
नमस्कार मित्रांनो, आज आपण विविध विषयांमध्ये घेता येत असलेल्या उच्च शिक्षणाची माहिती घेणार आहोत. आपण फार्मसी, बायोमेडिकल वा औषधे निर्माणामध्ये करिअर करणार असाल, तर न्यू जर्सी, पेंसिल्वानिया, न्यूयॉर्क येथील विद्यापीठांतून प्रवेश घ्यावा. याचे कारण असे, की जगातील बहुतेक फार्मा कंपनीचे मुख्य कार्यालये न्यू जर्सी येथे आहेत, यामुळे आपणास इंटरशिप व पुढे कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपणास टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री मिळवून कॅलिफोर्निया येथे चांगली संधी आहे, पण त्याचवेळी हा विचार करावा लागतो की कॅलिफोर्निया येथे राहण्याचा व शिक्षणाचा खर्च खूप आहे. इंजिनिअरिंगमधील अनेक विषय आहेत, त्यामध्ये मास्टर व पुढे डॉक्टरेट करून आपणास ग्रीन कार्ड मिळणे थोडे सोपे होते. कारण आपणास रिसर्च सायंटिस्ट म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या नोकरी देतात. तसेच आपल्याला प्राध्यापक म्हणूनही नोकरी मिळू शकते, कॉलेज, विद्यापीठांना ‘एचवनबी’चा कोटा नसतो. आपण भारतात एमबीए केले असल्यास अमेरिकेत एमबीए करायला या. चांगली संधी आहे. आजही अमेरिकेत आपण दुसरे बिल गेट्स, सत्या नडेला, वा स्टिव्ह जॉब्ज होऊ होऊ शकता. आपणास कोणत्याही सिस्टिममध्ये वा कोणत्याही प्रकारची अडचणीला सामोरे जावे लागत नाही. आपल्या व आपल्या पुढील पिढीच्या शिक्षणासाठी मोठी संधी आहे. आपण फक्त विविध इंजिनिअरिंग, फार्मा, मेडिकलचा विचार करतो, मात्र इतर ही अनेक विषय आहेत व त्याची सर्व माहिती आपणास अमेरिकन दूतावासाच्या ‘अमेरिकेत शिक्षण’ या लिंकवर क्लिक करून मिळवू शकता. आपणास कोणत्याही मध्यस्थाची आवश्‍यकता भासणार नाही. आपण कोणत्याही विद्यापीठात, कॉलेजमधील प्राध्यापक व इंटरनॅशनल स्टुडंट ऑफिसशी संपर्क करू शकता. त्यामुळे आपणास कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण येणार नाही. आपण साधारण तीन ते चार विद्यापीठांत ॲडमिशनसाठी अर्ज करावे व त्यातून आपणास खर्च, त्यांचे रँकिंग व मुख्य म्हणजे लोकेशन महत्त्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunities in Higher Education

Tags
टॉपिकस
Topic Tags: