व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘पेरा सीईटी’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

विद्यार्थ्यांना ‘पेरा सीईटी’ परीक्षेसाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘पेरा सीईटी’चे आयोजन

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विनंतीनुसार प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) या राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेतर्फे यंदा दुसऱ्यांदा सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ही परीक्षा ३० जून आणि १ व २ जुलै दरम्यान ऑनलाइनद्वारे होणार आहे.

विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या परीक्षेचा निकाल ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे. ‘पेरा’ ही खासगी विद्यापीठांची संघटनेने देशभरातील विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अभियांत्रिकी, जैव अभियांत्रिकी, डिझाइन, फाईन आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी अशा खासगी विद्यापीठातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी घेतली जाते. या सीईटीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक माहितीसाठी ‘www.peraindia.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Organizing Pera Cet For Vocational Courses Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top