आईनं मोडलेल्या दागिन्यांचं पोरानं केलं चीज; पंकजची पोलिस दलात बाजी

Central Police Force
Central Police Forceesakal
Summary

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पंकजनं पाचवीपासून वर्गातील प्रथम क्रमांक सोडला नाही.

कऱ्हाड (सातारा) : आईने (Mother) मुलाच्या पुस्तकासाठी दागिने मोडले, वडिलांनी माथाडी कामगार म्हणून काम करून पै-पै जमा करून मुलाच्या शिक्षणासाठी घातले. बहिणीनेही हातभार लावला. आई-वडील बहिणीने केलेल्या कष्टाचे गोटेवाडीचा सुपुत्र पंकज आमले (Pankaj Amle) याने चीज करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पंकजने केंद्रीय पोलिस दलात (Central Police Force) उपनिरीक्षकपदी देशातील आठ लाख तरुणांमधून बाजी मारली आहे. त्याने मिळवलेले यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही चांगला अभ्यास करून पंकजने पाचवीपासून वर्गातील प्रथम क्रमांक सोडला नाही. घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे आईने मुलाच्या शिक्षणासाठी दागिने मोडले. वडील माथाडी कामगार होते. त्यांनी पै-पै जमा करून मुलाला चांगले शिक्षण देण्याचा मानस ठेवला होता. मात्र, तरीही त्यांना आर्थिक अडचण आली. त्यामुळे पैशाअभावी त्याला इंजिनिअरिंगला (Engineering) प्रवेश घेता आली नाही. आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार त्याने वेणूताई चव्हाण कॉलेजला बीएला प्रवेश घेऊन पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून काम केले. त्यानंतर कुरियरमध्येही काम केले. त्यादरम्यान त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीकॉम केले. त्यानंतर त्याने खाकी वर्दीत जाण्याचे स्वप्न मनी घेऊन वाटचाल सुरू केली. त्यासाठी पंकजने केंद्रीय पोलिस दलात भरती होण्याचे ठरवले. त्या दरम्यान आलेल्या कोरोनामुळे ही भरतीच दोन वर्षे झाली नाही.

Central Police Force
'या' छोट्याशा गावानं देशाला दिलेत तब्बल 47 IAS, IPS अधिकारी

त्यादरम्यान पंकजने तीन वर्षे एमआर म्हणून काम करून घरच्यांना आर्थिक हातभार लावला. यावेळी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय पोलिस दलाची त्याने परीक्षा दिली. त्यामध्ये देशातून आठ लाखांवर तरुण बसले होते. त्यात पहिल्याच प्रयत्नात सीआयएसएफमध्ये सेंट्रल पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा पंकज पास झाला. देशातून आठ लाख तरुणांपैकी सीआयएसएफमध्ये (CISF) केवळ ६२३ तरुणांची निवड झाली. त्यामध्ये पंकजने २०० पैकी १८५ गुण मिळवून देशात गुणवत्ता यादीत बाजी मारली. लॉकडाउनमध्ये (Lockdown) सराव करण्यासाठी पंकजला मैदान उपलब्ध नव्हते. आई-वडील आणि बहिणीच्या पाठबळावर अनेक अडचणींचा सामना करून पंकजने मिळवलेले यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

मुख्य परीक्षेला जातानाही अडचण

जुलै २०२१ मध्ये मुख्य परीक्षेला जाताना प्रचंड पावसामुळे गाड्या बंद होत्या. त्यामुळे पंकजसमोर मुंबई गाठायची मोठी अडचण होती. त्यासाठी चार किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन मालवाहतुकीच्या ट्रकमधून पंकजने वडिलांसमवेत मुंबई गाठली. त्यामध्ये त्याने जिद्दीने आगाशिव डोंगरावर सात महिने सराव करून १६०० मीटर रनिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याचा लेखी परीक्षेसाठीचा आत्मविश्वासही दुणावला.

Central Police Force
CBSE : १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मी शिक्षण घेतले. माझे खाकी वर्दीत जायचे स्वप्न मी अनेक अडचणींचा सामना करून पूर्ण केले आहे. जिद्द बाळगून ध्येय ठेवून कार्यरत राहिल्यास जगात काहीच अशक्य नाही, हे मी सिद्ध करून दाखवले आहे.

पंकज आमले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com