मुलांसाठी योग्य मार्गदर्शक निवडण्यात पालकांची भूमिका कळीची

मुलांसाठी खासगी क्लास किंवा मार्गदर्शकाची निवड करण्यात पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते, असे ‘असर २०२१’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
मुलांसाठी योग्य मार्गदर्शक निवडण्यात पालकांची भूमिका कळीची
Summary

मुलांसाठी खासगी क्लास किंवा मार्गदर्शकाची निवड करण्यात पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते, असे ‘असर २०२१’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पुणे - आपला मुलगा अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये अधिक गतिमान आहे; पण तो प्रॅक्टिसला जाताना दमून जातो, हे लक्षात आल्यावर त्याचे आई-वडील मैदानाजवळ वास्तव्य असणार्‍या नातलगांकडे त्याची राहण्याची सोय करतात. तोच मुलगा पुढे सचिन तेंडुलकर म्हणून ओळखला जातो. मुलाची आवड नेमकी काय आहे आणि त्याला आपण काय उपलब्ध करून द्यायला पाहिजे, हे त्या पालकांना कळले. त्यामुळे क्रिकेटजगताला ‘सचिन’ लाभला. मुलांमधील बलस्थाने आणि त्यांच्यातील उणिवा ओळखून योग्य मार्गदर्शक निवडण्यात पालकांची भूमिका कळीची ठरते. ‘ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’च्या (असर २०२१) आकडेवारीनुसार देशभरात गेल्या तीन वर्षांत खासगी क्लास किंवा मार्गदर्शकाची मदत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८.६ टक्क्यांवरून ३९.२ टक्क्यांवर गेली आहे.

मुलांसाठी खासगी क्लास किंवा मार्गदर्शकाची निवड करण्यात पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते, असे ‘असर २०२१’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कोरोनानंतर यात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचेही समोर येते. अल्प, मध्यम आणि उच्च शिक्षित अशा प्रत्येक गटातील पालकांना खासगी क्लासचे महत्त्व पटले असून, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत खासगी क्लासची निवड करण्याचे प्रमाण सरासरी १० टक्क्यांनी वाढले आहे.

आपले मूल काय उत्तम करू शकते आणि कशात ते कमी पडते, हे पालकांना मूल जन्माला आल्यापासून हळूहळू समजायला सुरुवात होते. काही मुले स्वभावाने कुरकुरी असतात, तर काही रडकी, काही रागीट, काही सहनशील आणि काही हसरी असतात. विज्ञानानुसार, मुलांच्या स्वभावाचे एकूण नऊ प्रकार आहेत आणि या स्वभावगुणांनुसार मुलांची बलस्थाने अधोरेखित होऊ लागतात. शाळेतही मुलांना कोणते विषय आवडत आहेत, कोणत्या विषयांत मुले कमी पडतात, याचा अंदाज आल्यावर ज्या विषयांत मूल उत्तम आहे, त्यावर पुरेसे लक्ष केंद्रित करीत असतानाच ज्या विषयात ती कमी पडत आहेत, त्या विषयांसाठी योग्य मार्गदर्शन घेणे हेही आवश्यक असते. आपल्या मुलांना इतर कोणासारखे बनविण्याऐवजी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडविण्याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

उमलत्या वयात योग्य मार्गदर्शनासाठी चांगल्या मार्गदर्शकांची निवड करणे, त्यांना विषय सहज समजेल अशा पद्धतीने शिकविण्यावर भर कोठे दिला जातोय, अशी मार्गदर्शक संस्था निवडणे आवश्यक असते. शिक्षक व क्लास असे हवेत जे मुलांच्या मनात विषयाबद्दल असलेली भीती कमी करून, तो विषय मुलांना सहज समजावून देतील. परीक्षेतील गुण आणि मेरिट लिस्टच्या शर्यतीत आपल्या मुलांची दमछाक करून घेण्याऐवजी पालकांनी शिक्षणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

मुलांना अभ्यास ही बाब कधीही कटकट वाटता कामा नये. मुलांचा अभ्यासात रस टिकून राहील अशा पद्धतीने त्यांना ॲक्टिव्हिटीज दिल्या पाहिजेत. खेळातून अभ्यास असेल, तर मुलांना त्यात मजा येते. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या स्मार्ट पद्धतीही मुलांना शिकविल्या पाहिजेत. ‘माईंड मॅप्स’सारखे प्रकार सहजपणे मुलांना कसे वापरता येतील, हे शिकविणारे शिक्षक आणि संस्था निवडल्या पाहिजेत.

आदर्श मार्गदर्शकाची सात वैशिष्ट्ये

स्टॅनफर्ड विद्यापीठातील मानसशास्राचे प्राध्यापक मार्क लेपर आणि बालरोगतज्ज्ञ मारिया वुल्व्हर्टन यांनी प्रदीर्घ अभ्यासाअंती आदर्श मार्गदर्शकाची सात वैशिष्ट्ये नोंदविली आहेत. प्रत्येक वैशिष्ट्याच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार INSPIRE असे नामकरण झालेले हे मॉडेल आता जगभरात रूढ झालेले आहे.

१. Intelligent - प्रज्ञावान

२. Nurturant - संगोपक

३. Socratic - तात्त्विक

४. Progressive - प्रागतिक

५. Indirect - गर्भित

६. Reflective - चिंतनशील

६. Encouraging - प्रोत्साहक

पालक मुलांची बलस्थाने कशी ओळखू शकतात?

• शाळेत मूल कोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेते आहे, यावरून कल लक्षात येऊ शकतो.

• मूल कोणत्या विषयाचा अभ्यास करण्याचा टाळते, त्यावरून मुलांची कमजोरी लक्षात घेता येते.

• कोणत्या विषयाचा अभ्यास करताना मूल रिलॅक्स असते ते बघा, त्यावरून अनेक गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो.

मुलांच्या अभ्यासातील अडचणी कशा ओळखायच्या?

• मुलांना वाचायला अडचणी येत आहेत का?

• आकडेमोड करताना मुलांना चटकन सोडविता येत नाहीये का? गणिताचा प्रश्न नीट समजत नाहीये का?

• अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नाहीये का?

• मूल पाठांतरात कमी पडते आहे का?

• दिशा ओळखण्यात मुलाला अडचणी येत आहेत का?

• एकाग्रता कमी पडते आहे का?

मोफत अभियोग्यता चाचणीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Register for a free Aptitude Test at a centre close to you

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com