पॅट’ परीक्षा , विद्यार्थी संख्येनुसार प्रश्‍नपत्रिकांचा अपुरा पुरवठा; कोट्यावधी रुपयाचा निधी असूनही अपुऱ्या प्रश्नपत्रिका

शालेय शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट (पॅट) परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रश्‍नपत्रिकांचा अपुरा पुरवठा केल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
PAT examination insufficient supply of question papers according to number of students
PAT examination insufficient supply of question papers according to number of studentsSakal

पिंपरी : शालेय शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट (पॅट) परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रश्‍नपत्रिकांचा अपुरा पुरवठा केल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी असूनही एका दिवसावर परीक्षा आलेली असताना शाळांना विद्यार्थी संख्येनुसार प्रश्‍नपत्रिका मिळाल्या नाहीत.

परिणामी शाळा किंवा शिक्षकांनी पदरमोड करून प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढल्या आहेत. शासनाकडे विद्यार्थ्यांची नोंद असताना असा गोंधळ होतोच कसा? कशी घ्यायची विद्यार्थ्यांची ‘पॅट’ परीक्षा ? असा प्रश्‍न मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.

प्रथम भाषा , इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील प्रोग्रेशन असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षा ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यातच अनेक प्रश्‍नपत्रिका या दहा ते बारा पानी आहेत.

या प्रश्‍नपत्रिका जिल्हास्तरावरून प्रत्येक शाळेला वितरित केल्या जात आहेत. परंतु, शाळांनी केलेल्या मागणीनुसार प्रश्‍नपत्रिका मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, वेळेत प्रश्‍नपत्रिका नसतील तर परीक्षा कशी घ्यायची याबाबत शाळा व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

विद्यार्थीच्या सगळ्या नोंदी शासनाकडे

‘सरळ पोर्टल’, संच मान्‍यता आणि आकडावहीच्या माध्यमातून विद्यार्थीच्या सगळ्या नोंदी शासनाकडे आहेत. शाळेने गणित विषयाच्या इयत्ता पाचवीच्या ५५ प्रश्‍नपत्रिका मागीतल्या होत्या. त्यावर केवळ ५ प्रश्‍नपत्रिका दिल्या गेल्या.

तसेच सहावीच्या ७८ प्रश्‍नपत्रिकाऐवजी ४ आणि सातवीच्या ७५ प्रश्‍नपत्रिका मागवल्या असताना केवळ ५ तर आठवीच्या १०० प्रश्‍नपत्रिकांची मागणी केलेली असताना केवळ २० प्रश्‍नपत्रिका दिल्या गेल्या आहेत, असे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले.

‘‘विद्यार्थीच्या सगळ्या नोंदी शासनाकडे आहेत. तरी शासनाकडून अशी चुक होतेच कशी? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. वारंवार विद्यार्थी संख्या मागविण्यात येते. मग इतका गाफीलपणा कसा होउ शकतो. मंगळवारी आकडावहीच्या झेरॉक्स काढून नेण्यात आल्या आहेत. तरी विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत प्रश्‍नपत्रिककमी आल्या आहेत. ’’

-निलेश गायकवाड, जिजामाता माध्यमिक विद्यालय भोसरी

‘‘जिल्हास्तरावरून केलेल्या मागणीनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तसेच प्रश्‍नपत्रिका बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’

- डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com