

Career After 10th
sakal
प्रा. विजय नवले-करिअर मेंटॉर
दहावीनंतर अकरावी सायन्सला जाताना पहिला प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ग्रुप कोणता घ्यावा? पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) की पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी)? की पीसीएमबी?
ही निवड केवळ पुढील दोन वर्षांची नसून संपूर्ण करिअरची दिशा ठरवणारी असते. त्यामुळे हा निर्णय भावनेवर नाही, तर योग्य माहिती, स्वतःची क्षमता आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन घ्यायला हवा. त्याआधी हे पाहावे लागेल की कोणत्या ग्रुपनंतर कोणत्या संधी आहेत?