

"स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारे खरे शिक्षण!" प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक यांनी उलगडला पंचकोश विकसनाचा मार्ग.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
पंचकोश संकल्पनेच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार आपण या मालिकेत पाहत आहोत. मनुष्याकृती सर्व प्राण्यांची क्षमता अगदी समान आहे, सर्वांना अमर्याद इन्द्रियसुखाचा जन्मजात अधिकार आहे आणि तेच मानवी जीवनाचे अंतिम लक्ष आहे अशा स्वरूपाचा पूर्णतः अभारतीय विचार जीवनाचा आदर्श बनू पाहत असताना पंचकोश विकसन या संकल्पनेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. या भागात परत एकदा एकत्रितपणे साररूपात पंचकोश आणि त्यांचे आंतरसंबंध पाहू या.
अन्नापासून निर्माण होणारा कोश म्हणजे अन्नमय कोश. शरीर, अवयव, स्नायू, पेशी यांचे अस्तित्व अन्नावर आधारित आहे. योग्य आहार, विहार आणि विश्रांती यांच्या साहाय्याने या कोशाचा विकास होतो. हा सर्व व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.